Saturday, July 31, 2010

१ ऑगस्ट च्या निमित्त्ताने

मित्रांनो, आजचे पोस्ट थोडे वेगळे आहे.  आज १ ऑगस्ट, बरेच जण आजचा दिवस फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करतील....त्याला माझा विरोध नाही....पण तो साजरा करतांना आपण काही विसरत आहोत का याचा विचार मात्र जरूर करा.
 Bal G. Tilak.jpg

किती  जणांना माहित आहे की आज १ ऑगस्ट ही, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी, वयाच्या पासष्ठाव्या वर्षी, या थोर विचारवंत क्रांतीकारकाचा देहांत झाला. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान आपण जाणतोच. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हे त्यांनी केलेले एक मोठे कार्य होते, ज्यामुळे लोकांचे एकत्रीकरण करून समाजजागृती करणे असा त्यांचा मूळ उद्देश होता. निष्णात वकील तसेच स्वराज्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले लोकमान्य, तितकेच महान तर्कशास्त्री व खगोलतज्ञही होते. 

त्यांनी लिहीलेल्या "Arctic home in the Vedas", सारख्या पुस्तकांनी, वेदांचा काळ, आर्यांचे स्थलांतर, हिमयुगाचा काळ (संदर्भ - विकीपीडीया), पंचांग आणि चालू पंचांगातील सुधारणा इ. गोष्टी मांडल्या. नक्षत्रांच्या स्थितीवरून त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे असा ठरवला, तसेच त्याचे मृग नक्षत्राच्या स्थानावरून केलेले गणनही दाखवले.अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाच्या स्मृतींना माझा प्रणाम.