Tuesday, April 6, 2010

आय पॅडला वायफायचा त्रास

आयपॅड, अ‍ॅपलचे नवीन स्वप्न अखेर बाजारात उपलब्ध झाले. अ‍ॅपलने नुकतेच जाहिर केले आहे की गेल्या शनिवारी ३,००,००० आयपॅड विकले गेले, तरीही अ‍ॅपलचे म्हणणे आहे की काही दुकाने शनिवारी बंद असल्याने विक्री अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या फक्त वायफाय असलेले मॉडेल उपलब्ध आहे. ३जी मॉडेल या महिनाअखेरीला मिळू लागेल.

अ‍ॅपलने तक्रारींच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा रस्ता धरला आहे. आयपॅडचे झालेले जोरदार स्वागत लक्षात घेतले तरी तितक्याच वेगाने त्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणि बर्‍याचश्या तक्रारी आहेत वायफाय कनेक्शनबद्दल. 

आयपॅडच्या काही मालकांनी कमी वायफाय संकेत (weak signal), संपर्कात येणारे अडथळे (connection drop) आणि महाजाळ्याचा कमी वेग अशा प्रश्नांनी अनेक अ‍ॅपल सपोर्टचे फोरम भरू लागले आहेत. गेल्या सोमवार पर्यंत वायफाय प्रश्नांबद्दल जवळजवळ १३० फोरमपोस्ट लिहीले गेले आणि ते १३००० हून जास्त वेळा पाहिले गेले.

ह्या प्रश्नांचे गांभिर्य इतके आहे की जवळजवळ दर ५-१० मिनीटांनी संपर्कात अडथळा आल्याचे एका वापरकर्त्याने  mBell75 लिहीले आहे. जे पोस्ट आता अ‍ॅपलकडून काढून टाकण्यात आले आहे. 

1 comment: