Saturday, February 13, 2010

विंडोज मोबाईल 7 Series

मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल . जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.

बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!

फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा

1 comment:

  1. नमस्कार
    विन्डोज ७ बद्दल गूगल न्युज मधे माहिती आलि आहे. त्यानि सेत दाखवला पण हाताळायला नाहि दिला असे म्हटले आहे.
    हि सर्व खेळणी ज्याना चाग्ले येते त्यान्च्या साठीच. नाही तर कोन्फ़्युजनच जास्त!!!!( म्हणजे माझ्या सारख्यान्चे!)

    ReplyDelete