Monday, February 15, 2010

'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे

आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.

सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.

दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच ॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०., विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.

विंडोज मोबाईल सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे ‍‍ की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन . मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.

अखेर फायदा वापरणार्‍याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/

No comments:

Post a Comment