Tuesday, October 12, 2010

नवीन मोबाईल कार्यप्रणाली - विंडोज फोन ७

पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो...
मायक्रोसॉफ्टने असे १० मोबाईल हँडसेट बाजारात उतरवण्याची घोषणा केली आहे.

Saturday, July 31, 2010

१ ऑगस्ट च्या निमित्त्ताने

मित्रांनो, आजचे पोस्ट थोडे वेगळे आहे.  आज १ ऑगस्ट, बरेच जण आजचा दिवस फ्रेंडशीप डे म्हणून साजरा करतील....त्याला माझा विरोध नाही....पण तो साजरा करतांना आपण काही विसरत आहोत का याचा विचार मात्र जरूर करा.
 Bal G. Tilak.jpg

किती  जणांना माहित आहे की आज १ ऑगस्ट ही, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पुण्यतिथी आहे. १ ऑगस्ट १९२० रोजी, वयाच्या पासष्ठाव्या वर्षी, या थोर विचारवंत क्रांतीकारकाचा देहांत झाला. त्यांचे स्वातंत्र्यलढ्यातले योगदान आपण जाणतोच. सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात हे त्यांनी केलेले एक मोठे कार्य होते, ज्यामुळे लोकांचे एकत्रीकरण करून समाजजागृती करणे असा त्यांचा मूळ उद्देश होता. निष्णात वकील तसेच स्वराज्याचे खंदे पुरस्कर्ते असलेले लोकमान्य, तितकेच महान तर्कशास्त्री व खगोलतज्ञही होते. 

त्यांनी लिहीलेल्या "Arctic home in the Vedas", सारख्या पुस्तकांनी, वेदांचा काळ, आर्यांचे स्थलांतर, हिमयुगाचा काळ (संदर्भ - विकीपीडीया), पंचांग आणि चालू पंचांगातील सुधारणा इ. गोष्टी मांडल्या. नक्षत्रांच्या स्थितीवरून त्यांनी वेदांचा काळ इसवी सन पूर्व ४५०० वर्षे असा ठरवला, तसेच त्याचे मृग नक्षत्राच्या स्थानावरून केलेले गणनही दाखवले.



अशा या आदरणीय व्यक्तीमत्वाच्या स्मृतींना माझा प्रणाम.

Sunday, May 9, 2010

रुब्रिक क्यूब आणि मोटोरोला ड्रॉईड

नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्‍याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.


आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.


 जोडलेला व्हिडीयो पहा.
 
रुब्रिकक्यूब हा जगातल्या सर्वाधिक प्रसिध्द खेळापैकी एक असून, त्यात एका ठो़कळ्याच्या सर्व बाजू रंगवलेल्या असतात आणि तो 9 x 9 x 9  तुकड्यांना जोडून बनवलेला असतो. हे सर्व तुकडे फिरवून पुन्हा सर्व बाजू सारख्या आणणे हे खरोखर एखाद्या बुध्दीवंताचे काम आहे. (वैयक्तीक अनुभवातून बनलेले मत)

Monday, May 3, 2010

इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६०% पेक्षा कमी

नेट अ‍ॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्‍यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अ‍ॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे.

 मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९% ग्राहक घालवला आहे, ज्यातील बहुसंख्यांनी गूगल क्रोम ला पसंती दिली आहे. फायरफॉक्सने आपला हिस्सा वाचवला असून आता तो २५% च्या उंबरठ्यावर उभा आहे.

याची कारणे
इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःच.. आयई ५, ६, ७ आणि ८, हे सर्व मिळून इंटरनेट एक्सप्लोररचा जवळजवळ ९९% ग्राहक वापरतात. यात आयई ७ आणि ८ ने सुरुवातीच्या काळात निराशा केली होती. (आठवा आय ई ८ ला सुरुवातीला जीमेल उघडत नसे, आणि अजूनही काही साईटस कॉम्पीटॅबिलीटी मोड मध्ये पहाव्या लागतात.) याच काळात ज्या ग्राहकांनी फायरफॉ़क्स, सफारी किंवा ऑपेरा सारखे ब्राऊजर निवडले, त्यांना परत इंटरनेट एक्सप्लोररकडे आणण्यात मायक्रोसॉफ्टला अपयश आले. त्याच वेळी मल्टीटॅब ब्राऊसिंगसारखी आता सर्वत्र आढळणारी फिचर्स देऊन, मो़झिल्लाने स्वताचा ग्राहक वाढवला, जे आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररला जवळजवळ तीन वर्षे लागली. सततच्या मिळणार्‍या प्लग-ईन, नवीन आवॄत्या (वर्जन्स) आणि हवा तसा बदलण्याची सोय (कस्टमायझेशन) पाहून मोझिल्लाचा (आताच्या फायरफॉक्सचा) ग्राहक वर्ग प्रामाणिक राहीला. सफारीवर बनवण्यात आलेला वेबकिट नाईट्ली ( पहा http://nightly.webkit.org) एकेकाळी सर्वोत्कॄष्ट ब्राऊजर बनला होता. ऑपेराने सुद्धा आपला जगातील सर्वात वेगवान हा लौकीक बर्‍यापैकी सांभाळला.  पुढे आलेल्या गूगल क्रोमने, वेबकिटचा कोड आणि फायरफॉक्स्ची फ्लेक्सीबलीटी एकत्र आणली.
या सर्व गडबडीत मायक्रोसॉफ्टने, काही नवीन गोष्टी प्रयत्न केल्या पण ते पुरे पडले नाहीत. वन क्लीक शेअरींग, फेवरेईट बार, आरएसएस फीडसारखेच वेब्स्लाईसेस इ. गोष्टीनी, ग्राहकांमध्ये होणारी घसरण फार कमी केली नाही. पहा - माझे जूने पोस्ट 

आता  जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा आवॄत्ती आलेली आहे, मी थोड्या सुधारणांची अपेक्षा नक्कीच करतो. विंडोज ७  च्या यशानंतर आणि विंडोज मोबाईल ७ प्रमाणे संपूर्ण नव्याने बनवलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ कडून अपेक्षा बर्‍याच आहे. पाहूया...घोडामैदान जवळच आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा इथून डाऊनलोड करता येईल - http://ie.microsoft.com/testdrive/

जरूर वापरून पहावे असे काही - 

वेबकिट डाऊनलोड करा http://nightly.webkit.org
हे वापरण्यासाठी सफारी इंस्टॉल असणे गरजेचे आहे. http://www.apple.com/safari/download/ 
आणि 
वेबकिट इंस्टॉल करण्यासाठी पहा - http://priscimon.com/blog/2008/06/04/four-easy-steps-to-running-webkit-on-windows/


 तुमचा ब्राऊजर टेस्ट करा - http://acid3.acidtests.org/ मी फायरफॉक्स वापरतो, माझा स्कोर आहे ९४/१००

Tuesday, April 6, 2010

आय पॅडला वायफायचा त्रास

आयपॅड, अ‍ॅपलचे नवीन स्वप्न अखेर बाजारात उपलब्ध झाले. अ‍ॅपलने नुकतेच जाहिर केले आहे की गेल्या शनिवारी ३,००,००० आयपॅड विकले गेले, तरीही अ‍ॅपलचे म्हणणे आहे की काही दुकाने शनिवारी बंद असल्याने विक्री अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या फक्त वायफाय असलेले मॉडेल उपलब्ध आहे. ३जी मॉडेल या महिनाअखेरीला मिळू लागेल.

अ‍ॅपलने तक्रारींच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा रस्ता धरला आहे. आयपॅडचे झालेले जोरदार स्वागत लक्षात घेतले तरी तितक्याच वेगाने त्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणि बर्‍याचश्या तक्रारी आहेत वायफाय कनेक्शनबद्दल. 

आयपॅडच्या काही मालकांनी कमी वायफाय संकेत (weak signal), संपर्कात येणारे अडथळे (connection drop) आणि महाजाळ्याचा कमी वेग अशा प्रश्नांनी अनेक अ‍ॅपल सपोर्टचे फोरम भरू लागले आहेत. गेल्या सोमवार पर्यंत वायफाय प्रश्नांबद्दल जवळजवळ १३० फोरमपोस्ट लिहीले गेले आणि ते १३००० हून जास्त वेळा पाहिले गेले.

ह्या प्रश्नांचे गांभिर्य इतके आहे की जवळजवळ दर ५-१० मिनीटांनी संपर्कात अडथळा आल्याचे एका वापरकर्त्याने  mBell75 लिहीले आहे. जे पोस्ट आता अ‍ॅपलकडून काढून टाकण्यात आले आहे. 

Saturday, March 6, 2010

कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला नवीन 'मॉर्डन वॉरफेअर-२'

नुकताच मी कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला सर्वात नवीन खेळ खेळून संपवला. 'मॉर्डन वॉरफेअर - २' हा अतिशय सुंदर बनवलेला गेम आहे. इंन्फीनिटी वार्डने अगोदरच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेपासून(COD -1, COD -2 United Offensive etc.) पासून खूपच सुधारणा केली आहे. पहिले गेम्स खेळलेल्यांना माहित असेल, की त्यांची रचना 'घडनाक्रमावर अनुसरून' (event based) होती. या नवीन खेळात मात्र अत्यंत व्यवस्थित ठरवण्यात आलेला व 'कार्य अनुसरून' (action based) असा गेमप्ले आहे.


हा एकव्यक्ती (single player) प्रथमदृष्टी (First Person Shooter) प्रकारचा खेळ आहे (ह्या शब्दांना अचूकमराठी प्रतिशब्द सापडला नाही) ह्यातील प्रत्येक मोहिम एक ठराविक लक्ष ठरवून सुरू होते, आणि गेमप्ले अत्यंतवेगवान आहे. पूर्ण खेळ जगभरात अफगाणिस्थान, क्युबा, रशिया, अमेरिका अश्या अनेक ठिकाणी घडतो. ग्राफिक्स फार सुंदर आहेत, बर्फाचे वादळ, वाळवंट, क्युबातील झोपडपट्या इ. फार सुंदर बनवले आहेत.

ह्या गेमसाठी संगणकाची गरज थोडी जास्त आहे.
पेंटीयम ४ (३.२ गिगाहर्ट्झ) कोअर २ड्यूओ (१.८ गिगाहर्ट्झ) किंवा एएमडी अॅथलॉन ३२००+ चे प्रोसेसर, कमीतकमी ५१२ मेगाबाईट रॅम, कमीतकमी एन्विडीया गीफोर्स ६६०० GT (१२८ मेगाबाईट) किंवा एटीआय रेडिओन१६०० XT (१२८ मेगाबाईट) चे ग्राफिक्स कार्ड असावे. १६ गीगाबाईट ची जागा ह्या प्रचंड खेळाला लागते, पण खेळपाहिल्यावर त्या जागेचे सार्थक आहे.

मी काही स्क्रीनशॉट येथे देत आहे. खालील चित्रांवर क्लीक केले कीपुर्ण चित्र दिसेल.



अधिक माहितीसाठी पहा
http://www.callofduty.com
विकीपीडीया

Thursday, February 25, 2010

ब्लूम एनर्जीसर्व्हर

परवा सचिनच्या व्दिशतकाने आपल्या सर्वाचे लक्ष एका अजून महत्वाच्या बातमीकडे गेले नाही. सिलिकॉनव्हॅलीमधील एका अनिवासी भारतीयाने (के. आर. श्रीधर) स्थापन केलेल्या ब्लूमएनर्जी या कंपनीने आपले नवीन प्रॉडक्ट जाहिर केले, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जासंकट टाळणे शक्य होईल. पण ह्या प्रॉडक्टबद्दल जगात अजून प्रश्नच जास्त आहेत. पाहूया त्यातील काही प्रश्न...

१. हे एनर्जीसर्व्हर अखेर आले कुठून?
मंगळावरून, म्हणजे नासाच्या मंगळावर पाठवण्याच्या यानासाठी हे तंत्रज्ञान बनवण्यात आले. एनर्जीसर्व्हर नावाने आलेले हे खास बनावटीचे यंत्र, पेटंट घेण्यात आलेल्या ऑक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानाने बनवले गेले आहेत, जे इंधन जाळण्यापेक्षा रासायनिक प्रक्रीयेने ऊर्जा तयार करतात. जे जवळजवळ दुप्पट जास्त कार्यक्षम (efficient) आहेत. अशा सेल पासून २५ वॅट उर्जा मिळते, असे अनेक सेल एका एनर्जी-सर्वर मध्ये आहेत, जो १०० किलोवॅटची ऊर्जा देतो.

२. ह्यात खास काय?
दुप्पट कार्यक्षम (efficient) असलेले हे सर्व्हर ऊर्जा साठवण्याचे काम पण करतात सारख्याच ऊर्जा देणार्या सामान्य Generator पेक्षा खूपच कमी जागेत आणि इंधनात काम करतात.

३. ह्याला लागते काय?
मूळ प्रक्रीया हायड्रोकार्बनचे रासायनिक अपघटन करून ऊर्जा मिळवण्याची आहे. सध्या उपलब्ध एनर्जीसर्व्हर नैसर्गिक वायू तसेच बायोगॅसवर चालू शकतात.

४. कोण घेणार हे नवीन यंत्र?
अनेक कंपन्या ज्या ऊर्जेसाठी आधीच करोडो रुपये / डॉलर घालत आहेत, त्यांच्यासाठी 8,00,000 ते 10,00,000 USD देणे हा फायद्याचा सौदा आहे. गूगल, वॉलमार्ट, फेडेक्स, कोक, बँक ऑफ अमेरिका, इबे, स्टॅपल्स असे अनेक मोठे उद्योग ह्या एनर्जीसर्व्हरचे पहिले ग्राहक आहेत.

५. हे घरगुती वापराला येणार का?
सध्या नाही पण कंपनीचे म्हणणे आहे की घरगुती वापरालायक युनिट येत्या काही वर्षात तयार केले जाईल, आणि साधारणपणे $३००० ला मिळेल.

हे सर्व झाले तरीही काही प्रश्न अनुत्तरीत आहेतच...
जसे की
१. एनर्जी-सर्व्हरचे आयुष्य किती? प्रत्येक फ्युएलसेल चिरकाळ टिकणारी सांगितली जाते पण पूर्ण यंत्रणेचे आयुष्य हा एक प्रश्न आहेच.
२. ह्या एनर्जी-सर्व्हरमधून प्रदूषण फार कमी होत असले तरी खूप जास्त उष्णता तयार होते. ह्या जास्तीच्या उष्णतेचा वापर करण्याचे काही उपाय अजून तरी ब्लूमएनर्जी कंपनीने सांगितलेले नाहियेत.
३. ह्या यंत्राचा रखरखाव आणि कामातला खंड (maintenance) या गोष्टीचा काहीही उल्लेख कुठेही नाहीये. गूगलचे म्हणणे आहे की ही यंत्रणा जवळजवळ 98% वेळ काम करते. पण बाकीचे 2% ठराविक वेळेने येते का अचानक यावर कोणीच काहीही बोलत नाहिये. कारण एखाद्या उद्योगासाठी दिवसाचे 2% वेळ बंद पडणे फार धोक्याचे आहे.

हे ब्लूम एनर्जीसर्व्हर निश्चितच एक मोठे पाऊल आहे. पण जवळजवळ १०० अजून कंपन्या तरी अशा नक्कीच आहेत ज्या ह्या किंवा अशाच काही प्रॉडक्टवर संशोधन करत आहेत. आता असे वाटते की ऊर्जेचे प्रश्न आता अजून सहजपणे सोडवले जातील.











अधिक
माहितीसाठी पहा - http://www.bloomenergy.com
उपकरणाच्या अधिक माहितीसाठी पहा - http://c0688662.cdn.cloudfiles.rackspacecloud.com/downloads_pdf_Bloomenergy_DataSheet_ES-5000.pdf

Monday, February 15, 2010

'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे

आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.

सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.

दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच ॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०., विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.

विंडोज मोबाईल सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे ‍‍ की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन . मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.

अखेर फायदा वापरणार्‍याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/

Saturday, February 13, 2010

विंडोज मोबाईल 7 Series

मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल . जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.

बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!

फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा

Thursday, February 11, 2010

अँटीव्हायरस घेताना

विंडोजवर चालणार्या संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो. अगदी त्या संगणकाला इंटरनेट जोडलेले नसले तरीही, पेन-ड्राईव्ह, मोबाईल इ. मधून हे अनाहूत पाहूणे कधी ना कधी तरी हजेरी लावतात.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मग घेतले जातात अँटीव्हायरस.

आजचा हा लेख त्यावरच. अँटीव्हायरस घेताना आणि घेतल्यावर काय काय काळजी घ्यायची याची थोडक्यातमाहिती.


मी नुकतेच माझ्या दोन्ही काँप्यूटरसाठी काही अँटीव्हायरस वापरून पाहिले. त्याची comparison तुलना देत आहे.

१. AVG Antivirus - http://www.avg.com/in-en/homepage
चांगले - फुकट मिळत असल्याने प्रसिध्द, अपडेट फाईल डाऊनलोड करून मग अपडेट करता येतो त्यामुळे इंटरनेटची गरज नाही.
वाईट - स्कॅनिंग करताना फार खोलवर जात नाही. व्हायरस ओळखण्याची ताकद कमी आणि काम करयाला बर्‍यापैकी जड (CPU usage जास्त)

मत - वाईट.

२. AVAST Antivirus home edition - http://www.avast.com/free-antivirus-download
चांगले - फुकट, अपडेट फाईल लहान असल्याने झटकन अपडेट होतो.
वाईट - स्कॅनिंग ठीकठाक, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण currupt files रिपेअर करणे याला फारसे जमत नाही. जास्त भर फाईल Delete करण्यावर असतो.

मत - बरा - डायल अप किंवा मोबाईल इंटरनेट वापरणार्‍यांनी वापरयाला हरकत नाही.

३. Quick heal - trial version http://www.quickheal.co.in/downloads.asp
चांगले - हा पुणेरी अँटीव्हायरस वापरायला सोपा आहे, DNAScan तंत्रज्ञानामुळे व्हायरस थांबवतो (पसरू देत नाही) असे कंपनी म्हणते. वापरायला हलका (Less CPU Usage), अँटीव्हायरसमध्येसुध्दा website ब्लॉ़कींगउपलब्ध.
वाईट - स्कॅनिंग चांगले, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण काही व्हायरस याला Startup मधून काढून टाकतात, आणि त्यावेळी manually अँटीव्हायरस सुरु करावा लागतो. काही (जसे की autorun, dx.dll/scr.ini) वर फार प्रभावी नाही.

मत - चांगला पण संपूर्ण संरक्षणासाठी बरोबर एखादे anti-malware (जसे की removeit pro) वापरावे

4. Kaspersky Internet Security 2010 - http://www.kaspersky.com
चांगले - अप्रतिम आणि संपूर्ण अँटीव्हायरस, सर्व प्रकारचे संरक्षण (web, IM, Parental Control, Application, antivirus, hacker-shield etc.) देतो. संपूर्ण रंग बदलणारा interface धोक्याची सूचना लगेच देतो. किंमतीलापरवडेल असा आहे.
वाईट - वापरायला थोडा कठीण आहे. काही applications जसे की mediaplayer classic ला बंद करतो. अपडेटचीसाईज थोडी जास्त आहे.

मत - चांगला. फक्त अपडेटसाठी शक्यतो ब्रॉडबँड इंटरनेट असावे.

५. Norton Internet Security 2010 - http://www.symantec.com/downloads/index.jsp
चांगले - जगातील सर्वोत्कृष्ट अँटीव्हायरसपैकी एक. संपूर्ण विश्वासार्ह संरक्षण. अपडेट फाईल डाऊनलोड करतायेते, त्यामुळे इंटरनेट शिवाय पण अपडेट होतो
वाईट - महाग आहे. काँप्यूटरचे काम हळू करतो, कारण resource usage जास्त आहे.मो अपडेट साईज मोठी आहे

मत - उत्कृष्ट. ब्रॉडबँड इंटरनेट आणि वेगवान संगणक असेल तर जरूर वापरावे.


इतरही अनेक अँटीव्हायरस उपलब्ध आहेत जसे की, McAffee, e-Scan, NOD32, CA antivirusm, AntiVir, Net Protector इत्यादी. मी अजून ते वापरून पाहिलेले नाहीत. वापरल्यावर इथे नक्की लिहेन.

अँटी व्हायरस बरोबर अजून काही सॉफ्टवेअर्स जरूर वापरावीत.
१. RemoveIT Pro - हा anti-Malware आहे. घरगुती वापरासाठी फुकट उपलब्ध आहे. इथे पहा
२. Anti-trojan -ट्रोजन आपल्या काँप्यूटरमध्ये हेराचे काम करून आपली माहिती बाहेर पाठवतात. ट्रोजनकाढण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरावे. अशी अजून सॉफ्टवेअर आहेत. त्याबददल नंतर कधीतरी.
३. RRT - Remove Restrictions Tool - इथे पहा - जेव्हा व्हायरसमुळे task manager, folder options, registry editor वगैरे बंद होतात तेव्हा ते पुन्हा चालू करण्यासाठी हे टूल मदत करू शकते.


काही टिप्स
१. कोणताही अँटीव्हायरस पूर्ण संरक्षणाची खात्री देत नाही, आपण काळजी घेणे हे गरजेचे आहे.
२. जेव्हा अँटीव्हायरस काहीही report देइल तेव्हा तो पूर्ण वाचा. न बघता OK करू नका.
३. अँटीव्हायरस हे precautionary measure आहे. काहीवेळा व्हायरस infect झाल्या नंतर अँटीव्हायरस install होऊ शकत नाहीत.
४. केवळ अँटीव्हायरस असून भागत नाही. त्याला वेळच्या वेळी अपडेट करा, आणि full system scan महिन्यातून एकदा तर कराच.
५. पायरेटेड अँटीव्हायरस (किंवा कोणतेही सॉफ्टवेअर) वापरू नका. हा गुन्हा आहेच तसेच ते सॉफ्टवेअर पूर्णपणे काम करेल याची खात्री नसते.
६. फुकट मिळणारे सर्व अँटीव्हायरस चांगले असतात असे नाही. (मी अँटीव्हायरसची तुलना पहा)
७. बाहेरील storage media जोडतांना, ते स्कॅन करून घ्या.
८. Paid अँटीव्हायरस घेण्याअगोदर त्याचे DEMO version, डाऊनलोड करून वापरून पहा

काही शंका/सूचना असतील तर मला मेल करा - vkrmkulkarni@gmail.com
मी माझ्या माहितीप्रमाणे जास्तीतजास्त मदत करीन.


Wednesday, February 3, 2010

चॉकलेट आवडते?

एकेकाळी लकी गोल्डमन कॉर्पोरेशन म्हणून ओळखल्या जाणार्या LG ने बहुप्रतिक्षित BL40 हे मॉडेल चॉकलेट टच या नावाने (अखेर) भारतीय बाजारात आणले आहे.

एका उत्कृष्ट टीसर कॅम्पेन नंतर, दाखवण्यात आलेल्या या सुंदर हँडसेट्ने अनेक जणांची मने जिंकली होती. अमेरिकेत वेरिझोन बरोबर चॉकलेट टच उतरवण्याची योजना सुरुवातीला बारगळली होती आणि BL40 ऐवजी एक दुसराच मोबाईल (VX8575) चॉकलेटटच म्हणून उतरवण्यात आला पहा एनगॅजेट मोबाईल. मग युरोपियन बाजारात, BL40 आपल्या मूळ नावाने दाखल झाला तो ऑक्टोबर २००९ मध्ये. आणि अखेर भारतात यायला त्याला जानेवारी २०१० उजाडले.



आता पाहूया की ही चीज आहे काय...
इंचाचा हाय डेफिनिशन स्पर्शसंवेदी स्क्रॅचप्रूफ काचेचा डिस्प्ले जो ३४५ x ८०० पिक्सेल (WVGA) रिसोल्यूशन आणि उत्कृष्ट दर्जाचे १६: वाईडस्क्रीन व्हिडीयो देतो.
पूर्ण वेब अनुभव आडव्या स्क्रोलिंगची गरज लागत नाही, बरोबर G आहेच.
आउटलूकसारखी स्क्रीनचे दोन भाग असलेला वापर, त्यामुळे इमेल आणि आपले contacts एकदम वापरता येतात.
वन टच कॉपी आणि पेस्ट - इंटरनेट वरची माहिती पाठवणे एकदम सोपे, एका स्पर्शावर माहिती हवी तशी वापरता येईल.
गेश्चर कमांड्स - एखादा आकार काढून ते काम सुरु करता येते.
कॅमेरे मोठा मेगा पिक्सेल कॅमेरा (२५६० x १९२०) फोटोग्राफीसाठी आणि दुसरा VGA व्हिडीयो कॉन्फोरन्सिंगसाठी
गीबी मेमरी आणि ३२ गीबी पर्यंत मेमरी कार्ड चालते.
एलजीची एस क्लास ऑपरेटींग सिस्टीम. एलजीने बरेच काम केले आहे त्यावर, कारण ARENA त्याचा फारसा चांगला उपयोग केला गेला नव्हता.
mp3, FM, 3.5 मिमीचा कने़क्टर (स्टॅर्डड हेडफोन), इक्वलायझर आणि इतरही बरेच काही
हाय डेफिनेशन व्हिडीयो (HD)
चार स्क्रीनची फिरणारी UI
HSDPA 7.2
128 x 51 x 10mm आकार आणि १३१ ग्रॅम वजन
आणि इतर सर्व गोष्टी ज्या एका मस्त मोबाईल हॅडसेटकडून अपेक्षा करता.

हे चॉकलेट खिशासाठी मात्र थोडेसे जडच आहे जवळजवळ २६ हजार रुपये.

मी आता पैसे साठवयाला सुरुवात करतोय...तुमचे काय?


सूचना - लेखकाचा एलजी अथवा इतर कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही, सदरहू माहिती ही फक्त संदर्भ आणि आवड म्हणून देण्यात आली आहे.

Friday, January 29, 2010

२००९ मागे वळून पाहताना

सन २००९ मध्ये घडलेल्या गॅजेटविषयक दहा महत्त्वाच्या घटना मी आणि informationweek.com ने (वेगवेगळ्या) निवडल्या होत्या. मी माझी यादी देत आहे.

. अँड्रोईड चा उदय - २००९ मध्ये प्रथमच, मोबाईलजगतात हार्डवेअरपे़क्षा सॉफ्टवेअरमध्ये जास्त विकास झाला. गूगलने मुक्त वापर (open-source) प्रकारात उपलब्ध केलेली मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम अँड्रोईडने, स्मार्टफोन्सच्या जगात चांगलाच जम बसवला. हा मायक्रोसॉफ्टच्या विंडोजमोबाईलला मिळालेला अजून एकफटका. आताच नवीन जाहिर केलेल्या अँड्रोईड आवृत्तीमध्ये प्रथमच ॅडोब फ्लॅश १०. आणि अजून बरीचआकर्षक सोयी दिल्या आहेत. अँड्रोईडचा वाढणारा चाहतावर्ग, हा मुक्त माहिती आदानप्रदानाच्या गूगलच्याविचाराचा समर्थकच असेल.

. मोटोरोलाचे पुनरागमन - वर्ष २००८ पर्यंत motorola हा कच्चा लिंबू मानला जात होता. पण २००९ मध्ये Motorola ने अँड्रोईड मालिकेतील अप्रतिम हँड्सेट्स देऊन त्यांनी ही कमी पूर्ण केली. ह्या क्रांतीला सुरुवात झाली MotoCLIQ पासून आणि आता मोटोड्रॉईड सारखे नवीन युगाचे प्रॉड्क्ट देऊन मोटोरोलाने २०१० चे स्वागत केलेआहे. बघुया, २०१० मध्ये अजून काय काय लपले आहे ते!

. iPhone 3GS - सुरुवातीला, message forwarding सारखे काही बेसिक फीचर्स नसल्यामुळे भारतात थोड्याशिव्या खाल्लेल्या iPhone ने एकदम सुधारीत 3GS आवृत्ती आणली. ॅपलने एक संशोधित (evolutionary upgrade) म्हणून आणलेला हा प्रकार आयफोनसाठी क्रांतिकारक सुधारणा (revolution) ठरला. आधीच्यामॉडेलमध्ये असलेल्या जवळजवळ सर्व प्रॉब्लेमसना दुरुस्त करून, आता iPhone पूर्ण झाला आणि अपेक्षेप्रमाणेच या मॉडेलला प्रतिसादही चांगलाच मिळाला.

. मोबाईल ॅप्लिकेशन स्टोअर - दुकान आता मोबाईल सॉफ्टवेअरसाठी - २००९ हे वर्ष गाजले ते mobile application stores या कल्पनेचा उगम म्हणून. सुरुवात ॅपलने iPhone Apps Store ने केली, मग Winmobile Marketplace आणि Android Community ने सुद्धा ही सुविधा उपलब्ध केली. ॅपल स्टोअरने १०००० ॅप्लिकेशन्सचा जादूई आकडा पार केला तोही याच वर्षी. (त्यातील किती ॅप्लिकेशन लोकांना आवडली हा एक संशोधनाचा विषय आहे!) या वर्षी सर्वात जास्त आणि वेगाने वाढलेल्या Android Community ने तर१३,००० चा पल्ला पार केलाय. हेच भविष्याचे बाजार असतील बहुतेक.

. ॅपलने नाकारलेले GoogleVOICE - पुन्हा यावर्षीच्या सर्वात प्रसिध्द मोबाईलने अजून एकदा या यादीत नावमिळवले, पण या वेळी वाईटगोष्टीसाठी. गूगलने GoogleVOICE हे ॅप्लिकेशन ॅपलला जून २००९ मध्येपाठवले होते, पण ते iPhone Application Store मध्ये कधीच आले नाही; त्या ऐवजी एक वेगळेच ॅप्लिकेशन, GoogleVOICE सेवेसाठी देण्यात आले, जे गूगलने अधिकृत केलेले नव्हते.
"ॅपलच्या प्रतिनिधीने सांगितले की, GoogleVOICE आयफोनच्या मूळ उद्देशालाच (voice calling) पर्यायउपलब्ध करून देते. जे कंपनीला परवडणारे नाही. " असे गूगलच्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले होते.
माझ्या मते, आयफोनसाठीची ॅपलची सहयोगी AT&T ने आक्षेप घेतल्यामुळे ते ॅप्लिकेशन नाकारण्यात आले, कारण त्यामुळे AT&Tच्या सेवेला पर्याय निर्माण झाला असता.

ब्लॅकबेरी आता प्रत्येकासाठी - यावर्षी Storm आणि Storm2 सारखे Touch-enabled हँडसेट काढूनब्लॅकबेरीने, ईमेल फोन आणि स्मार्टफोन मधील दरी कमी करण्याचा चांगला प्रयत्न केला. इतकी वर्षे केवळउच्चभ्रू आणि अतिश्रीमंत वर्गाची मक्तेदारी राहिलेल्या ब्लॅकबेरीने या वर्षी, कमी किंमतीचे मॉडेल्सही उपलब्धकेले. ब्लॅकबेरी कर्व (curve) ने केवळ व्यावसायिकांसाठी असलेली ब्लॅकबेरीची प्रतिमा, हौशी वापरणार्‍यांसाठी ब्लॅकबेरी अशी केली.

. पामटॉपसाठी आता webOS - पाम कंपनीने अखेर PocketPC शी असलेला संबंध अधिकृतरीत्या संपवूनस्वतःच्या webOS ची घोषणा केली. पाम प्री (Palm Pre) हे उच्च वर्गीय, Palm pixie हे मध्यम किंमतीचे मॉडेलआणून पामने आपली जागा नवीन वर्षासाठी पक्की केली आहे.

. विंडोजमोबाईल संकटात - या सर्व हॅपनिंग वर्षामध्ये विंडोजमोबाईल . मात्र सपशेल आपटला. टचस्क्रीनसाठीचा वाढीव सपोर्ट, नवीन बनवलेला यूजर इन्टरफेस आणि नवीन फीचर्स असून सुध्दा ही आवृत्ती, तांत्रिक बाजूला कमी पडली. मायक्रोसॉफ्टची अपेक्षा आहे की २०१० मध्ये कमीत कमी ३० मोबाईल फोनविंडोजवाले येतील, यातील काही प्रसिध्द नावे जसे की तोशिबा, एसर, एचटीसी, सॅमसंग आणि एलजीइलेक्ट्रोनिक्स. पण विंडोजला जिवंत राहण्यासाठी बरेच हातपाय मारावे लागतील हे मात्र खरे!

. सिंबियन आता OpenSource - ह्या सर्व गजबजाटात थोडासा दुर्लक्षित खेळाडू आहे, सिंबीयन. आता नोकीयाकॉर्पोरेशनचा भाग असलेली ही मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम, आजघडीला सर्वात जास्त स्मार्टफोनला चालते. यावर्षी नोकीयाने सिंबियन फाउंडेशन स्थापन करून, या सिस्टीमला ओपनसोर्स केले आहे, ज्याने गेले पूर्ण वर्षसिंबियन मधील कमकुवत दुवे शोधून दुरुस्त केले आहेत. सिंबीयनबद्दल विकासकांची (developers) नेहमीचीतक्रार म्हणजे, अत्यंत अवघड प्रोग्रामिंग. अनेक वर्षाचा जुना आणि अनेक तुकडे (patch) जोडून उभा केलेला हा२००००० ओळींचा कोड आता नवीन मोबाईलसाठी थोडा जास्तच जड आहे. २०१० मध्ये तरी सिंबियनची rd Edition येईल अशी आशा.

१०. संगणकनिर्माते आता मोबाईल निर्मीतीमध्ये - HP IPAQ नंतर आता ACER पण मोबाईलच्या विश्वातउतरत आहे. ACERने 1GHz प्रोसेसरवाला जगातील सर्वात वेगवान स्मार्ट्फोन सादर करून बाजारात दमदारप्रवेश केला आहे. अशी बातमी आहे की DELL पण आपला कोणे एके काळी गुंडाळून ठेवलेला स्मार्ट्फोन प्रोजेक्टपुन्हा सुरु करतेय.

वातावरण तापतेय हेच खरे..

मूळ लेख इथे वाचा.

Thursday, January 28, 2010

अखेर अ‍ॅपलची अप्सरा आली..

अपेक्षेप्रमाणे ॅपलने काल (२७ जानेवारी) आपला टॅबलेट अखेर जाहिर केलाय.

एका रंगारंग कार्यक्रमात ॅपलचे प्रमुख स्टीव्ह जॉबसने,तो जाहिर केलाय. मला लगेच तो चेक करता आला नाहीयेपण engadget.com ने ते काम केलेय आणि त्यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे.

. एक मोठा iPhone सारखे features आहेत.
. अत्यंत बारीक (super thin)असला तरी हलका नाहीये. १०२४ रिसोल्युशनचा डिस्प्ले केवळ बघतच रहावा असाअप्रतिम आहे.
. CPU अत्यंत वेगवान आहे, पण multitasking नाहीये. एका वेळी एकच काम करता येते.
. ईबुक वाचणे हे खरे पुस्तक वाचण्याइतके सोपे आहे.
पण
. कॅमेरा नाही, त्यामुळे व्हिडीयो कॉन्फोरन्सींग नाही. इतकेच काय, SMS ॅप्लिकेशन पण नाही. infact हामोबाईल नाहीये, tablet PC ही संकल्पना अजून भारतीयांमध्ये फार रुळली नाहीये, त्यामुळे ipad ला एकचमकू-चीज इतकेच महत्व मिळेल, असे मला वाटते.
. किबोर्ड रिस्पॉन्स फार चांगला नाहीये, जितका तो प्रोमोमध्ये दिसतो तितका तर नाहीयेच, असे engadget चेम्हणणे आहे, आणि व्हिडीयोमध्ये ते लगेच दिसते.
. आणि, जसे की इतके दिवस अंदाज लावला जात होता, ipadला iphoneOS 3.2 वरच चालतो.
. फ्लॅश नाहीये, अगदी पक्का. अजूनपण ॅडोबचे आणि ॅपलचे काही जमलेले दिसत नाहीये.
पहा engadgetचा हा व्हिडीयो, पहिल्यांदाच हाती घेतलेला ipad.

अधिक माहितीसाठी engadgetचा खास लेख पहा.
‍‍ ‍ ‍‍
चित्र आणि व्हिडीयो engadget.com च्या सौजन्याने.
मी त्यांचा आभारी आहे.

Tuesday, January 26, 2010

नवीन सफरचंद

कित्येक वर्षापूर्वी न्यूटनसाहेबाच्या शेजारी एक सफरचंद पडले होते, ज्यामुळे मुलांना शाळेत पाठ करायलागुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मिळाला होता.

उद्या इतक्या वर्षांनंतर अजून एक APPLE नवीन इतिहास घडवेल अशी आशा मी, आणि जगभरातले बरेचसे
Gadgetकिडे करत आहेत.

ह्या सगळ्याला कारण आहे ही जाहिरात

बघुया उद्या कोणते APPLE पडते ते...


अरे हो... या निमित्ताने मी माझा पहिला मराठी ब्लॉग सुरु करित आहे...
माझ्या अगोदरच्या Technotronical MATRIX या ब्लॉगला समांतर असाच हा नवीन ब्लॉगही चालेल, फक्त
भाषेचा फरक राहिल.

माझ्याबद्दल थोडेसे...पुढच्या पोस्ट मध्ये...stay tuned...

मी कोण..

मी विक्रम उदय कुळकर्णी, दापोलीचा, कोकणातला.
शिक्षणाने कृषिअभियांत्रीकीमध्ये B.Tech. आणि मग Information Systems मध्ये MBA.
Programming, Gadgets, Games इत्यादीची मनापासून आवड.
(कदाचित माझ्या मराठी ब्लॉगर मित्रांचा असा समज होईल की, कोणताही IT/computer background नसतांना, हा पोरगा technology वर ब्लॉग कसा काढू शकतो, म्हणून हा खुलासा :D )

सध्या नोकरी शोधणे हा पूर्णवेळ CRM deployment consulting आणि झूमला सर्विस देणे हे अर्धवेळ कामकरतोय. पुढे मागे PhD करायचा विचार आहे, बघू कसे जमतेय ते.

माझा दुसरा (खरंतर पहिला) ब्लॉग सुरू होऊन आता जवळजवळ वर्षे झाली आहेत. मला जी काही वेगळीमाहिती मिळते ती लोकांपर्यंत पोचवण्याचे काम मी (इमानेइतबारे) गेली वर्ष करतोय. पहिल्यांदाच मराठीमध्येनेटवर लिहायचा प्रयत्न आहे. चूभूदेघे..

आज ॅपलाच्या बातमीकडे सर्व जगातील Gadgetकिड्यांचे लक्ष लागले असतानाच्या मुहुर्तावर मी हा ब्लॉग सुरुकरतोय...

आपल्या शुभेच्छांची अपेक्षा..