Thursday, February 25, 2010

ब्लूम एनर्जीसर्व्हर

परवा सचिनच्या व्दिशतकाने आपल्या सर्वाचे लक्ष एका अजून महत्वाच्या बातमीकडे गेले नाही. सिलिकॉनव्हॅलीमधील एका अनिवासी भारतीयाने (के. आर. श्रीधर) स्थापन केलेल्या ब्लूमएनर्जी या कंपनीने आपले नवीन प्रॉडक्ट जाहिर केले, ज्यामुळे भविष्यातील ऊर्जासंकट टाळणे शक्य होईल. पण ह्या प्रॉडक्टबद्दल जगात अजून प्रश्नच जास्त आहेत. पाहूया त्यातील काही प्रश्न...

१. हे एनर्जीसर्व्हर अखेर आले कुठून?
मंगळावरून, म्हणजे नासाच्या मंगळावर पाठवण्याच्या यानासाठी हे तंत्रज्ञान बनवण्यात आले. एनर्जीसर्व्हर नावाने आलेले हे खास बनावटीचे यंत्र, पेटंट घेण्यात आलेल्या ऑक्साईड फ्यूएल सेल तंत्रज्ञानाने बनवले गेले आहेत, जे इंधन जाळण्यापेक्षा रासायनिक प्रक्रीयेने ऊर्जा तयार करतात. जे जवळजवळ दुप्पट जास्त कार्यक्षम (efficient) आहेत. अशा सेल पासून २५ वॅट उर्जा मिळते, असे अनेक सेल एका एनर्जी-सर्वर मध्ये आहेत, जो १०० किलोवॅटची ऊर्जा देतो.

२. ह्यात खास काय?
दुप्पट कार्यक्षम (efficient) असलेले हे सर्व्हर ऊर्जा साठवण्याचे काम पण करतात सारख्याच ऊर्जा देणार्या सामान्य Generator पेक्षा खूपच कमी जागेत आणि इंधनात काम करतात.

३. ह्याला लागते काय?
मूळ प्रक्रीया हायड्रोकार्बनचे रासायनिक अपघटन करून ऊर्जा मिळवण्याची आहे. सध्या उपलब्ध एनर्जीसर्व्हर नैसर्गिक वायू तसेच बायोगॅसवर चालू शकतात.

४. कोण घेणार हे नवीन यंत्र?
अनेक कंपन्या ज्या ऊर्जेसाठी आधीच करोडो रुपये / डॉलर घालत आहेत, त्यांच्यासाठी 8,00,000 ते 10,00,000 USD देणे हा फायद्याचा सौदा आहे. गूगल, वॉलमार्ट, फेडेक्स, कोक, बँक ऑफ अमेरिका, इबे, स्टॅपल्स असे अनेक मोठे उद्योग ह्या एनर्जीसर्व्हरचे पहिले ग्राहक आहेत.

५. हे घरगुती वापराला येणार का?
सध्या नाही पण कंपनीचे म्हणणे आहे की घरगुती वापरालायक युनिट येत्या काही वर्षात तयार केले जाईल, आणि साधारणपणे $३००० ला मिळेल.

हे सर्व झाले तरीही काही प्रश्न अनुत्तरीत आहेतच...
जसे की
१. एनर्जी-सर्व्हरचे आयुष्य किती? प्रत्येक फ्युएलसेल चिरकाळ टिकणारी सांगितली जाते पण पूर्ण यंत्रणेचे आयुष्य हा एक प्रश्न आहेच.
२. ह्या एनर्जी-सर्व्हरमधून प्रदूषण फार कमी होत असले तरी खूप जास्त उष्णता तयार होते. ह्या जास्तीच्या उष्णतेचा वापर करण्याचे काही उपाय अजून तरी ब्लूमएनर्जी कंपनीने सांगितलेले नाहियेत.
३. ह्या यंत्राचा रखरखाव आणि कामातला खंड (maintenance) या गोष्टीचा काहीही उल्लेख कुठेही नाहीये. गूगलचे म्हणणे आहे की ही यंत्रणा जवळजवळ 98% वेळ काम करते. पण बाकीचे 2% ठराविक वेळेने येते का अचानक यावर कोणीच काहीही बोलत नाहिये. कारण एखाद्या उद्योगासाठी दिवसाचे 2% वेळ बंद पडणे फार धोक्याचे आहे.

हे ब्लूम एनर्जीसर्व्हर निश्चितच एक मोठे पाऊल आहे. पण जवळजवळ १०० अजून कंपन्या तरी अशा नक्कीच आहेत ज्या ह्या किंवा अशाच काही प्रॉडक्टवर संशोधन करत आहेत. आता असे वाटते की ऊर्जेचे प्रश्न आता अजून सहजपणे सोडवले जातील.











अधिक
माहितीसाठी पहा - http://www.bloomenergy.com
उपकरणाच्या अधिक माहितीसाठी पहा - http://c0688662.cdn.cloudfiles.rackspacecloud.com/downloads_pdf_Bloomenergy_DataSheet_ES-5000.pdf

Monday, February 15, 2010

'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे

आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.

सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.

दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच ॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०., विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.

विंडोज मोबाईल सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे ‍‍ की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन . मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.

अखेर फायदा वापरणार्‍याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/

Saturday, February 13, 2010

विंडोज मोबाईल 7 Series

मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल . जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.

बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!

फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा

Thursday, February 11, 2010

अँटीव्हायरस घेताना

विंडोजवर चालणार्या संगणकाला virus हा एक नेहमीचा प्रश्न असतो. अगदी त्या संगणकाला इंटरनेट जोडलेले नसले तरीही, पेन-ड्राईव्ह, मोबाईल इ. मधून हे अनाहूत पाहूणे कधी ना कधी तरी हजेरी लावतात.
या त्रासापासून मुक्त होण्यासाठी मग घेतले जातात अँटीव्हायरस.

आजचा हा लेख त्यावरच. अँटीव्हायरस घेताना आणि घेतल्यावर काय काय काळजी घ्यायची याची थोडक्यातमाहिती.


मी नुकतेच माझ्या दोन्ही काँप्यूटरसाठी काही अँटीव्हायरस वापरून पाहिले. त्याची comparison तुलना देत आहे.

१. AVG Antivirus - http://www.avg.com/in-en/homepage
चांगले - फुकट मिळत असल्याने प्रसिध्द, अपडेट फाईल डाऊनलोड करून मग अपडेट करता येतो त्यामुळे इंटरनेटची गरज नाही.
वाईट - स्कॅनिंग करताना फार खोलवर जात नाही. व्हायरस ओळखण्याची ताकद कमी आणि काम करयाला बर्‍यापैकी जड (CPU usage जास्त)

मत - वाईट.

२. AVAST Antivirus home edition - http://www.avast.com/free-antivirus-download
चांगले - फुकट, अपडेट फाईल लहान असल्याने झटकन अपडेट होतो.
वाईट - स्कॅनिंग ठीकठाक, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण currupt files रिपेअर करणे याला फारसे जमत नाही. जास्त भर फाईल Delete करण्यावर असतो.

मत - बरा - डायल अप किंवा मोबाईल इंटरनेट वापरणार्‍यांनी वापरयाला हरकत नाही.

३. Quick heal - trial version http://www.quickheal.co.in/downloads.asp
चांगले - हा पुणेरी अँटीव्हायरस वापरायला सोपा आहे, DNAScan तंत्रज्ञानामुळे व्हायरस थांबवतो (पसरू देत नाही) असे कंपनी म्हणते. वापरायला हलका (Less CPU Usage), अँटीव्हायरसमध्येसुध्दा website ब्लॉ़कींगउपलब्ध.
वाईट - स्कॅनिंग चांगले, व्हायरस बर्‍यापैकी ओळखतो, पण काही व्हायरस याला Startup मधून काढून टाकतात, आणि त्यावेळी manually अँटीव्हायरस सुरु करावा लागतो. काही (जसे की autorun, dx.dll/scr.ini) वर फार प्रभावी नाही.

मत - चांगला पण संपूर्ण संरक्षणासाठी बरोबर एखादे anti-malware (जसे की removeit pro) वापरावे

4. Kaspersky Internet Security 2010 - http://www.kaspersky.com
चांगले - अप्रतिम आणि संपूर्ण अँटीव्हायरस, सर्व प्रकारचे संरक्षण (web, IM, Parental Control, Application, antivirus, hacker-shield etc.) देतो. संपूर्ण रंग बदलणारा interface धोक्याची सूचना लगेच देतो. किंमतीलापरवडेल असा आहे.
वाईट - वापरायला थोडा कठीण आहे. काही applications जसे की mediaplayer classic ला बंद करतो. अपडेटचीसाईज थोडी जास्त आहे.

मत - चांगला. फक्त अपडेटसाठी शक्यतो ब्रॉडबँड इंटरनेट असावे.

५. Norton Internet Security 2010 - http://www.symantec.com/downloads/index.jsp
चांगले - जगातील सर्वोत्कृष्ट अँटीव्हायरसपैकी एक. संपूर्ण विश्वासार्ह संरक्षण. अपडेट फाईल डाऊनलोड करतायेते, त्यामुळे इंटरनेट शिवाय पण अपडेट होतो
वाईट - महाग आहे. काँप्यूटरचे काम हळू करतो, कारण resource usage जास्त आहे.मो अपडेट साईज मोठी आहे

मत - उत्कृष्ट. ब्रॉडबँड इंटरनेट आणि वेगवान संगणक असेल तर जरूर वापरावे.


इतरही अनेक अँटीव्हायरस उपलब्ध आहेत जसे की, McAffee, e-Scan, NOD32, CA antivirusm, AntiVir, Net Protector इत्यादी. मी अजून ते वापरून पाहिलेले नाहीत. वापरल्यावर इथे नक्की लिहेन.

अँटी व्हायरस बरोबर अजून काही सॉफ्टवेअर्स जरूर वापरावीत.
१. RemoveIT Pro - हा anti-Malware आहे. घरगुती वापरासाठी फुकट उपलब्ध आहे. इथे पहा
२. Anti-trojan -ट्रोजन आपल्या काँप्यूटरमध्ये हेराचे काम करून आपली माहिती बाहेर पाठवतात. ट्रोजनकाढण्यासाठी हे सॉफ्टवेअर वापरावे. अशी अजून सॉफ्टवेअर आहेत. त्याबददल नंतर कधीतरी.
३. RRT - Remove Restrictions Tool - इथे पहा - जेव्हा व्हायरसमुळे task manager, folder options, registry editor वगैरे बंद होतात तेव्हा ते पुन्हा चालू करण्यासाठी हे टूल मदत करू शकते.


काही टिप्स
१. कोणताही अँटीव्हायरस पूर्ण संरक्षणाची खात्री देत नाही, आपण काळजी घेणे हे गरजेचे आहे.
२. जेव्हा अँटीव्हायरस काहीही report देइल तेव्हा तो पूर्ण वाचा. न बघता OK करू नका.
३. अँटीव्हायरस हे precautionary measure आहे. काहीवेळा व्हायरस infect झाल्या नंतर अँटीव्हायरस install होऊ शकत नाहीत.
४. केवळ अँटीव्हायरस असून भागत नाही. त्याला वेळच्या वेळी अपडेट करा, आणि full system scan महिन्यातून एकदा तर कराच.
५. पायरेटेड अँटीव्हायरस (किंवा कोणतेही सॉफ्टवेअर) वापरू नका. हा गुन्हा आहेच तसेच ते सॉफ्टवेअर पूर्णपणे काम करेल याची खात्री नसते.
६. फुकट मिळणारे सर्व अँटीव्हायरस चांगले असतात असे नाही. (मी अँटीव्हायरसची तुलना पहा)
७. बाहेरील storage media जोडतांना, ते स्कॅन करून घ्या.
८. Paid अँटीव्हायरस घेण्याअगोदर त्याचे DEMO version, डाऊनलोड करून वापरून पहा

काही शंका/सूचना असतील तर मला मेल करा - vkrmkulkarni@gmail.com
मी माझ्या माहितीप्रमाणे जास्तीतजास्त मदत करीन.


Wednesday, February 3, 2010

चॉकलेट आवडते?

एकेकाळी लकी गोल्डमन कॉर्पोरेशन म्हणून ओळखल्या जाणार्या LG ने बहुप्रतिक्षित BL40 हे मॉडेल चॉकलेट टच या नावाने (अखेर) भारतीय बाजारात आणले आहे.

एका उत्कृष्ट टीसर कॅम्पेन नंतर, दाखवण्यात आलेल्या या सुंदर हँडसेट्ने अनेक जणांची मने जिंकली होती. अमेरिकेत वेरिझोन बरोबर चॉकलेट टच उतरवण्याची योजना सुरुवातीला बारगळली होती आणि BL40 ऐवजी एक दुसराच मोबाईल (VX8575) चॉकलेटटच म्हणून उतरवण्यात आला पहा एनगॅजेट मोबाईल. मग युरोपियन बाजारात, BL40 आपल्या मूळ नावाने दाखल झाला तो ऑक्टोबर २००९ मध्ये. आणि अखेर भारतात यायला त्याला जानेवारी २०१० उजाडले.



आता पाहूया की ही चीज आहे काय...
इंचाचा हाय डेफिनिशन स्पर्शसंवेदी स्क्रॅचप्रूफ काचेचा डिस्प्ले जो ३४५ x ८०० पिक्सेल (WVGA) रिसोल्यूशन आणि उत्कृष्ट दर्जाचे १६: वाईडस्क्रीन व्हिडीयो देतो.
पूर्ण वेब अनुभव आडव्या स्क्रोलिंगची गरज लागत नाही, बरोबर G आहेच.
आउटलूकसारखी स्क्रीनचे दोन भाग असलेला वापर, त्यामुळे इमेल आणि आपले contacts एकदम वापरता येतात.
वन टच कॉपी आणि पेस्ट - इंटरनेट वरची माहिती पाठवणे एकदम सोपे, एका स्पर्शावर माहिती हवी तशी वापरता येईल.
गेश्चर कमांड्स - एखादा आकार काढून ते काम सुरु करता येते.
कॅमेरे मोठा मेगा पिक्सेल कॅमेरा (२५६० x १९२०) फोटोग्राफीसाठी आणि दुसरा VGA व्हिडीयो कॉन्फोरन्सिंगसाठी
गीबी मेमरी आणि ३२ गीबी पर्यंत मेमरी कार्ड चालते.
एलजीची एस क्लास ऑपरेटींग सिस्टीम. एलजीने बरेच काम केले आहे त्यावर, कारण ARENA त्याचा फारसा चांगला उपयोग केला गेला नव्हता.
mp3, FM, 3.5 मिमीचा कने़क्टर (स्टॅर्डड हेडफोन), इक्वलायझर आणि इतरही बरेच काही
हाय डेफिनेशन व्हिडीयो (HD)
चार स्क्रीनची फिरणारी UI
HSDPA 7.2
128 x 51 x 10mm आकार आणि १३१ ग्रॅम वजन
आणि इतर सर्व गोष्टी ज्या एका मस्त मोबाईल हॅडसेटकडून अपेक्षा करता.

हे चॉकलेट खिशासाठी मात्र थोडेसे जडच आहे जवळजवळ २६ हजार रुपये.

मी आता पैसे साठवयाला सुरुवात करतोय...तुमचे काय?


सूचना - लेखकाचा एलजी अथवा इतर कोणत्याही कंपनीशी संबंधित नाही, सदरहू माहिती ही फक्त संदर्भ आणि आवड म्हणून देण्यात आली आहे.