पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो...
मायक्रोसॉफ्टने असे १० मोबाईल हँडसेट बाजारात उतरवण्याची घोषणा केली आहे.
gadg.et.y-kee.daa - a unique species of human, which believes in something new every day.
Showing posts with label windows. Show all posts
Showing posts with label windows. Show all posts
Tuesday, October 12, 2010
Monday, May 3, 2010
इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६०% पेक्षा कमी
नेट अॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे.
मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९% ग्राहक घालवला आहे, ज्यातील बहुसंख्यांनी गूगल क्रोम ला पसंती दिली आहे. फायरफॉक्सने आपला हिस्सा वाचवला असून आता तो २५% च्या उंबरठ्यावर उभा आहे.
याची कारणे
इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःच.. आयई ५, ६, ७ आणि ८, हे सर्व मिळून इंटरनेट एक्सप्लोररचा जवळजवळ ९९% ग्राहक वापरतात. यात आयई ७ आणि ८ ने सुरुवातीच्या काळात निराशा केली होती. (आठवा आय ई ८ ला सुरुवातीला जीमेल उघडत नसे, आणि अजूनही काही साईटस कॉम्पीटॅबिलीटी मोड मध्ये पहाव्या लागतात.) याच काळात ज्या ग्राहकांनी फायरफॉ़क्स, सफारी किंवा ऑपेरा सारखे ब्राऊजर निवडले, त्यांना परत इंटरनेट एक्सप्लोररकडे आणण्यात मायक्रोसॉफ्टला अपयश आले. त्याच वेळी मल्टीटॅब ब्राऊसिंगसारखी आता सर्वत्र आढळणारी फिचर्स देऊन, मो़झिल्लाने स्वताचा ग्राहक वाढवला, जे आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररला जवळजवळ तीन वर्षे लागली. सततच्या मिळणार्या प्लग-ईन, नवीन आवॄत्या (वर्जन्स) आणि हवा तसा बदलण्याची सोय (कस्टमायझेशन) पाहून मोझिल्लाचा (आताच्या फायरफॉक्सचा) ग्राहक वर्ग प्रामाणिक राहीला. सफारीवर बनवण्यात आलेला वेबकिट नाईट्ली ( पहा http://nightly.webkit.org) एकेकाळी सर्वोत्कॄष्ट ब्राऊजर बनला होता. ऑपेराने सुद्धा आपला जगातील सर्वात वेगवान हा लौकीक बर्यापैकी सांभाळला. पुढे आलेल्या गूगल क्रोमने, वेबकिटचा कोड आणि फायरफॉक्स्ची फ्लेक्सीबलीटी एकत्र आणली.
या सर्व गडबडीत मायक्रोसॉफ्टने, काही नवीन गोष्टी प्रयत्न केल्या पण ते पुरे पडले नाहीत. वन क्लीक शेअरींग, फेवरेईट बार, आरएसएस फीडसारखेच वेब्स्लाईसेस इ. गोष्टीनी, ग्राहकांमध्ये होणारी घसरण फार कमी केली नाही. पहा - माझे जूने पोस्ट
आता जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा आवॄत्ती आलेली आहे, मी थोड्या सुधारणांची अपेक्षा नक्कीच करतो. विंडोज ७ च्या यशानंतर आणि विंडोज मोबाईल ७ प्रमाणे संपूर्ण नव्याने बनवलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ कडून अपेक्षा बर्याच आहे. पाहूया...घोडामैदान जवळच आहे.
इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा इथून डाऊनलोड करता येईल - http://ie.microsoft.com/testdrive/
जरूर वापरून पहावे असे काही -
वेबकिट डाऊनलोड करा http://nightly.webkit.org,
हे वापरण्यासाठी सफारी इंस्टॉल असणे गरजेचे आहे. http://www.apple.com/safari/download/
आणि
वेबकिट इंस्टॉल करण्यासाठी पहा - http://priscimon.com/blog/2008/06/04/four-easy-steps-to-running-webkit-on-windows/
Monday, February 15, 2010
'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.
७ सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकअॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.
दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच अॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०.१, विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.
विंडोज मोबाईल ७ सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन इ. मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.
अखेर फायदा वापरणार्याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/
Saturday, February 13, 2010
विंडोज मोबाईल 7 Series
मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल ६.५ जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.
बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!
फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा
बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!
फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा
Subscribe to:
Posts (Atom)