Showing posts with label gadgetkida. Show all posts
Showing posts with label gadgetkida. Show all posts

Tuesday, October 12, 2010

नवीन मोबाईल कार्यप्रणाली - विंडोज फोन ७

पहा मायक्रोसॉफ्टची नवीन मोबाईल कार्यप्रणालीचा प्रत्यक्ष वापर होतानाचा व्हिडीयो...
मायक्रोसॉफ्टने असे १० मोबाईल हँडसेट बाजारात उतरवण्याची घोषणा केली आहे.

Sunday, May 9, 2010

रुब्रिक क्यूब आणि मोटोरोला ड्रॉईड

नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्‍याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.


आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.


 जोडलेला व्हिडीयो पहा.
 
रुब्रिकक्यूब हा जगातल्या सर्वाधिक प्रसिध्द खेळापैकी एक असून, त्यात एका ठो़कळ्याच्या सर्व बाजू रंगवलेल्या असतात आणि तो 9 x 9 x 9  तुकड्यांना जोडून बनवलेला असतो. हे सर्व तुकडे फिरवून पुन्हा सर्व बाजू सारख्या आणणे हे खरोखर एखाद्या बुध्दीवंताचे काम आहे. (वैयक्तीक अनुभवातून बनलेले मत)

Monday, May 3, 2010

इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६०% पेक्षा कमी

नेट अ‍ॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्‍यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अ‍ॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे.

 मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९% ग्राहक घालवला आहे, ज्यातील बहुसंख्यांनी गूगल क्रोम ला पसंती दिली आहे. फायरफॉक्सने आपला हिस्सा वाचवला असून आता तो २५% च्या उंबरठ्यावर उभा आहे.

याची कारणे
इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःच.. आयई ५, ६, ७ आणि ८, हे सर्व मिळून इंटरनेट एक्सप्लोररचा जवळजवळ ९९% ग्राहक वापरतात. यात आयई ७ आणि ८ ने सुरुवातीच्या काळात निराशा केली होती. (आठवा आय ई ८ ला सुरुवातीला जीमेल उघडत नसे, आणि अजूनही काही साईटस कॉम्पीटॅबिलीटी मोड मध्ये पहाव्या लागतात.) याच काळात ज्या ग्राहकांनी फायरफॉ़क्स, सफारी किंवा ऑपेरा सारखे ब्राऊजर निवडले, त्यांना परत इंटरनेट एक्सप्लोररकडे आणण्यात मायक्रोसॉफ्टला अपयश आले. त्याच वेळी मल्टीटॅब ब्राऊसिंगसारखी आता सर्वत्र आढळणारी फिचर्स देऊन, मो़झिल्लाने स्वताचा ग्राहक वाढवला, जे आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररला जवळजवळ तीन वर्षे लागली. सततच्या मिळणार्‍या प्लग-ईन, नवीन आवॄत्या (वर्जन्स) आणि हवा तसा बदलण्याची सोय (कस्टमायझेशन) पाहून मोझिल्लाचा (आताच्या फायरफॉक्सचा) ग्राहक वर्ग प्रामाणिक राहीला. सफारीवर बनवण्यात आलेला वेबकिट नाईट्ली ( पहा http://nightly.webkit.org) एकेकाळी सर्वोत्कॄष्ट ब्राऊजर बनला होता. ऑपेराने सुद्धा आपला जगातील सर्वात वेगवान हा लौकीक बर्‍यापैकी सांभाळला.  पुढे आलेल्या गूगल क्रोमने, वेबकिटचा कोड आणि फायरफॉक्स्ची फ्लेक्सीबलीटी एकत्र आणली.
या सर्व गडबडीत मायक्रोसॉफ्टने, काही नवीन गोष्टी प्रयत्न केल्या पण ते पुरे पडले नाहीत. वन क्लीक शेअरींग, फेवरेईट बार, आरएसएस फीडसारखेच वेब्स्लाईसेस इ. गोष्टीनी, ग्राहकांमध्ये होणारी घसरण फार कमी केली नाही. पहा - माझे जूने पोस्ट 

आता  जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा आवॄत्ती आलेली आहे, मी थोड्या सुधारणांची अपेक्षा नक्कीच करतो. विंडोज ७  च्या यशानंतर आणि विंडोज मोबाईल ७ प्रमाणे संपूर्ण नव्याने बनवलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ कडून अपेक्षा बर्‍याच आहे. पाहूया...घोडामैदान जवळच आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा इथून डाऊनलोड करता येईल - http://ie.microsoft.com/testdrive/

जरूर वापरून पहावे असे काही - 

वेबकिट डाऊनलोड करा http://nightly.webkit.org
हे वापरण्यासाठी सफारी इंस्टॉल असणे गरजेचे आहे. http://www.apple.com/safari/download/ 
आणि 
वेबकिट इंस्टॉल करण्यासाठी पहा - http://priscimon.com/blog/2008/06/04/four-easy-steps-to-running-webkit-on-windows/


 तुमचा ब्राऊजर टेस्ट करा - http://acid3.acidtests.org/ मी फायरफॉक्स वापरतो, माझा स्कोर आहे ९४/१००

Tuesday, April 6, 2010

आय पॅडला वायफायचा त्रास

आयपॅड, अ‍ॅपलचे नवीन स्वप्न अखेर बाजारात उपलब्ध झाले. अ‍ॅपलने नुकतेच जाहिर केले आहे की गेल्या शनिवारी ३,००,००० आयपॅड विकले गेले, तरीही अ‍ॅपलचे म्हणणे आहे की काही दुकाने शनिवारी बंद असल्याने विक्री अपेक्षेपेक्षा कमी आहे. सध्या फक्त वायफाय असलेले मॉडेल उपलब्ध आहे. ३जी मॉडेल या महिनाअखेरीला मिळू लागेल.

अ‍ॅपलने तक्रारींच्या बाबतीत मायक्रोसॉफ्टचा रस्ता धरला आहे. आयपॅडचे झालेले जोरदार स्वागत लक्षात घेतले तरी तितक्याच वेगाने त्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. आणि बर्‍याचश्या तक्रारी आहेत वायफाय कनेक्शनबद्दल. 

आयपॅडच्या काही मालकांनी कमी वायफाय संकेत (weak signal), संपर्कात येणारे अडथळे (connection drop) आणि महाजाळ्याचा कमी वेग अशा प्रश्नांनी अनेक अ‍ॅपल सपोर्टचे फोरम भरू लागले आहेत. गेल्या सोमवार पर्यंत वायफाय प्रश्नांबद्दल जवळजवळ १३० फोरमपोस्ट लिहीले गेले आणि ते १३००० हून जास्त वेळा पाहिले गेले.

ह्या प्रश्नांचे गांभिर्य इतके आहे की जवळजवळ दर ५-१० मिनीटांनी संपर्कात अडथळा आल्याचे एका वापरकर्त्याने  mBell75 लिहीले आहे. जे पोस्ट आता अ‍ॅपलकडून काढून टाकण्यात आले आहे. 

Saturday, March 6, 2010

कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला नवीन 'मॉर्डन वॉरफेअर-२'

नुकताच मी कॉल ऑफ ड्यूटी मालिकेतला सर्वात नवीन खेळ खेळून संपवला. 'मॉर्डन वॉरफेअर - २' हा अतिशय सुंदर बनवलेला गेम आहे. इंन्फीनिटी वार्डने अगोदरच्या कॉल ऑफ ड्यूटी मालिकेपासून(COD -1, COD -2 United Offensive etc.) पासून खूपच सुधारणा केली आहे. पहिले गेम्स खेळलेल्यांना माहित असेल, की त्यांची रचना 'घडनाक्रमावर अनुसरून' (event based) होती. या नवीन खेळात मात्र अत्यंत व्यवस्थित ठरवण्यात आलेला व 'कार्य अनुसरून' (action based) असा गेमप्ले आहे.


हा एकव्यक्ती (single player) प्रथमदृष्टी (First Person Shooter) प्रकारचा खेळ आहे (ह्या शब्दांना अचूकमराठी प्रतिशब्द सापडला नाही) ह्यातील प्रत्येक मोहिम एक ठराविक लक्ष ठरवून सुरू होते, आणि गेमप्ले अत्यंतवेगवान आहे. पूर्ण खेळ जगभरात अफगाणिस्थान, क्युबा, रशिया, अमेरिका अश्या अनेक ठिकाणी घडतो. ग्राफिक्स फार सुंदर आहेत, बर्फाचे वादळ, वाळवंट, क्युबातील झोपडपट्या इ. फार सुंदर बनवले आहेत.

ह्या गेमसाठी संगणकाची गरज थोडी जास्त आहे.
पेंटीयम ४ (३.२ गिगाहर्ट्झ) कोअर २ड्यूओ (१.८ गिगाहर्ट्झ) किंवा एएमडी अॅथलॉन ३२००+ चे प्रोसेसर, कमीतकमी ५१२ मेगाबाईट रॅम, कमीतकमी एन्विडीया गीफोर्स ६६०० GT (१२८ मेगाबाईट) किंवा एटीआय रेडिओन१६०० XT (१२८ मेगाबाईट) चे ग्राफिक्स कार्ड असावे. १६ गीगाबाईट ची जागा ह्या प्रचंड खेळाला लागते, पण खेळपाहिल्यावर त्या जागेचे सार्थक आहे.

मी काही स्क्रीनशॉट येथे देत आहे. खालील चित्रांवर क्लीक केले कीपुर्ण चित्र दिसेल.



अधिक माहितीसाठी पहा
http://www.callofduty.com
विकीपीडीया

Monday, February 15, 2010

'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे

आजवर मी (आणि इतरांनीही) विंडोज मोबाईलबद्दल जे बोललो होतो ते लवकरच इतिहासजमा होइल. बार्सिलोनाच्या मोबाईल वर्ल्ड कॉन्फोरन्स २०१० मध्ये मायक्रोसॉफ्ट आपला दुसरा सर्वात महत्वाकांक्षी प्रोजेक्ट दाखवणार आहे.
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.

सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.

दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच ॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०., विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.

विंडोज मोबाईल सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे ‍‍ की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन . मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.

अखेर फायदा वापरणार्‍याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/

Saturday, February 13, 2010

विंडोज मोबाईल 7 Series

मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल . जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.

बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!

फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा