नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.
आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.
जोडलेला व्हिडीयो पहा.
रुब्रिकक्यूब हा जगातल्या सर्वाधिक प्रसिध्द खेळापैकी एक असून, त्यात एका ठो़कळ्याच्या सर्व बाजू रंगवलेल्या असतात आणि तो 9 x 9 x 9 तुकड्यांना जोडून बनवलेला असतो. हे सर्व तुकडे फिरवून पुन्हा सर्व बाजू सारख्या आणणे हे खरोखर एखाद्या बुध्दीवंताचे काम आहे. (वैयक्तीक अनुभवातून बनलेले मत)
gadg.et.y-kee.daa - a unique species of human, which believes in something new every day.
Showing posts with label मोबाईल. Show all posts
Showing posts with label मोबाईल. Show all posts
Sunday, May 9, 2010
Monday, February 15, 2010
'विंडोज मोबाईल ७' स्वागत आहे
'विंडोज मोबाईल सेव्हन सिरीज', ही संपूर्णपणे नवी मोबाईल ऑपरेटींग सिस्टीम असणार आहे. मायक्रोसॉफ्टने ते खरोखर मुत्सद्दीपणे केले आहे. एक संपूर्ण नवीन सिस्टीम नव्याने उभी करून मायक्रोसॉफ्टने नवीन वर्षासाठी आपले स्थान बळकट केले आहे.
७ सिरीजचा UI, (मेट्रो UI) झ्यून एचडी ची आठवण नक्कीच करून देतो, पण दिसण्यापलीकडे तो खूप काही आहे. नायके (nike) च्या पूर्व डिझायनरने बनवलेली ही संपूर्ण नवीन UI अनेक tilesनी बनली आहे. प्रत्येक टाईल एकअॅप्लिकेशन किंवा काम दाखवते आणि त्यांची जागा तसेच क्रम बदलता येतो, ही एकदम नवीन कल्पना आहे. पण ह्या प्रकाराला वॉलपेपर नाही, सावली असलेले आयकॉन नाहीत. कोणतेही किचकट किंवा एकात एक उगघडणारे मेनू नाहीत. Social Networking कडे पुरेसे लक्ष देण्यात आले आहे.
दिसायला तरी सुंदर अशी ही चीज, कामात पण चांगली असेल अशी अपेक्षा. या मुहुर्तावरच अॅडोबने नविनमोबाईल फ्लॅश १०.१, विंडोज मोबाईल साठी नसेल अशी बातमी सोडली आहे. कदाचित त्याची भरपाईसिल्वरलाईट देऊन केली जाईल असे वाटते.
विंडोज मोबाईल ७ सिरिजच्या स्वागताला, जरी जगातले अनेक मोठे ब्रँड जसे की, क्वॉलकॉम, मोटोरोला, आसूस, एचपी, सॅमसंग, एलजी, एचटीसी, स्प्रिंट, टी-मोबाईल, वेरिझॉन इ. मंडळी आली असली तरी, जगातील सर्वात मोठामोबाईल निर्माता नोकिया कॉर्पोरेशनने मात्र सर्वात मोठा चीप निर्माता इंटेल बरोबर करार करून, अवलक्षण केलेआहे.
अखेर फायदा वापरणार्याचाच (आपलाच) आहे, कारण स्पर्धेमुळे चांगले मोबाईल किफायती दरात मिळतील अशी अपेक्षा...
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहा
http://www.windowsphone7series.com/
Saturday, February 13, 2010
विंडोज मोबाईल 7 Series
मायक्रोसॉफ्टचे विंडोज मोबाईल ६.५ जगाला फारसे मोहात पाडू शकले नाही. पण विंडोज मोबाईलच्या पुढच्याआवृत्तीकडून मात्र खूप अपेक्षा बाळगल्या जात आहेत आणि तो क्षण जवळ आलाय.
बार्सिलोनामध्ये उद्या पासून (भारतीय वेळेनुसार) सुरू होणार्या मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० मध्ये विंडोजमोबाईलचा नवा अवतार मायक्रोसॉफ्ट जाहीर करेल अशी बातमी आहे. काल मोबाईल वर्ल्ड कॉग्रेस २०१० च्यापूर्वतयारीच्या ठिकाणी एक मोठा बॅनर पाहण्यात आलेला आहे, ज्यावर विंडोज मोबाईलच्या लोगो खाली
एक झाकलेली पट्टी आहे. त्या फोटोवर थोडेफार फोटोशॉप काम केल्यावर ती गोष्ट उजेडात आलीय ती आहे.
नेहमीप्रमाणेच या सर्व घडामोडी टिपण्यासाठी engadget.com तिथे आहेच आणि हा गॅजेटकीडा त्या वेबसाईटवरनजर लावून आहे.
व्हॅलेंटाईन्स डे साजरा करण्याचा हा एक रुक्ष प्रकार होऊ शकतो, पण काय करणार माझी एक प्रेयसी आहे Technology!
फोटो आणि माहिती engadget.com वरून साभार.
मूळ लेख इथे पहा

Subscribe to:
Posts (Atom)