Sunday, May 9, 2010

रुब्रिक क्यूब आणि मोटोरोला ड्रॉईड

नुकताच एक व्हिडीयो पाहण्यात आला, ज्यात मोटोरोलाचा नवीन आणि महत्वाकांक्षी मोबाईल हँडसेट 'मोटो ड्रॉईड' एका रोबोटला जोडण्यात आला होता, आणि त्याच्या कॅमेर्‍याचा वापर करून, रुब्रिकचा ठोकळा सोडवण्याचा प्रयत्न केला गेला.


आलेले निकाल खरोखर धक्कादायक आहेत. मोटोड्रॉईडला रुब्रिकक्यूब सोडवायला केवळ २४ सेकंद लागले.


 जोडलेला व्हिडीयो पहा.
 
रुब्रिकक्यूब हा जगातल्या सर्वाधिक प्रसिध्द खेळापैकी एक असून, त्यात एका ठो़कळ्याच्या सर्व बाजू रंगवलेल्या असतात आणि तो 9 x 9 x 9  तुकड्यांना जोडून बनवलेला असतो. हे सर्व तुकडे फिरवून पुन्हा सर्व बाजू सारख्या आणणे हे खरोखर एखाद्या बुध्दीवंताचे काम आहे. (वैयक्तीक अनुभवातून बनलेले मत)

Monday, May 3, 2010

इंटरनेट एक्सप्लोरर प्रथमच ६०% पेक्षा कमी

नेट अ‍ॅप्लिकेशनच्या पाहणीनुसार, एप्रिल महिन्यात इंटरनेट एक्स्प्लोररच्या वापरणार्‍यांच्या संख्येत ऐतिहासीक घसरण झाली असून, ते प्रमाण आता ६०% च्या खाली गेले आहे. इंटरनेट एक्सप्लोरर ४ च्या (१९९९) नंतर प्रथमच हे प्रमाण इतक्या खाली गेले आहे. ह्या घटीसाठी हातभार मात्र गूगलच्या क्रोम या ब्राऊजरने लावला आहे. सलग चौथ्या महिन्यात, क्रोमने दोन आकडी वाढ दाखवत, अ‍ॅपलच्या सफारीला २ पॉईंटनी मागे टाकले आहे.

 मार्च २००९ मध्ये इंटरनेट एक्स्पोरर ८ जाहिर झाल्या नंतर मायक्रोसॉफ्टने जवळ जवळ ९% ग्राहक घालवला आहे, ज्यातील बहुसंख्यांनी गूगल क्रोम ला पसंती दिली आहे. फायरफॉक्सने आपला हिस्सा वाचवला असून आता तो २५% च्या उंबरठ्यावर उभा आहे.

याची कारणे
इंटरनेट एक्सप्लोरर स्वतःच.. आयई ५, ६, ७ आणि ८, हे सर्व मिळून इंटरनेट एक्सप्लोररचा जवळजवळ ९९% ग्राहक वापरतात. यात आयई ७ आणि ८ ने सुरुवातीच्या काळात निराशा केली होती. (आठवा आय ई ८ ला सुरुवातीला जीमेल उघडत नसे, आणि अजूनही काही साईटस कॉम्पीटॅबिलीटी मोड मध्ये पहाव्या लागतात.) याच काळात ज्या ग्राहकांनी फायरफॉ़क्स, सफारी किंवा ऑपेरा सारखे ब्राऊजर निवडले, त्यांना परत इंटरनेट एक्सप्लोररकडे आणण्यात मायक्रोसॉफ्टला अपयश आले. त्याच वेळी मल्टीटॅब ब्राऊसिंगसारखी आता सर्वत्र आढळणारी फिचर्स देऊन, मो़झिल्लाने स्वताचा ग्राहक वाढवला, जे आणण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोररला जवळजवळ तीन वर्षे लागली. सततच्या मिळणार्‍या प्लग-ईन, नवीन आवॄत्या (वर्जन्स) आणि हवा तसा बदलण्याची सोय (कस्टमायझेशन) पाहून मोझिल्लाचा (आताच्या फायरफॉक्सचा) ग्राहक वर्ग प्रामाणिक राहीला. सफारीवर बनवण्यात आलेला वेबकिट नाईट्ली ( पहा http://nightly.webkit.org) एकेकाळी सर्वोत्कॄष्ट ब्राऊजर बनला होता. ऑपेराने सुद्धा आपला जगातील सर्वात वेगवान हा लौकीक बर्‍यापैकी सांभाळला.  पुढे आलेल्या गूगल क्रोमने, वेबकिटचा कोड आणि फायरफॉक्स्ची फ्लेक्सीबलीटी एकत्र आणली.
या सर्व गडबडीत मायक्रोसॉफ्टने, काही नवीन गोष्टी प्रयत्न केल्या पण ते पुरे पडले नाहीत. वन क्लीक शेअरींग, फेवरेईट बार, आरएसएस फीडसारखेच वेब्स्लाईसेस इ. गोष्टीनी, ग्राहकांमध्ये होणारी घसरण फार कमी केली नाही. पहा - माझे जूने पोस्ट 

आता  जेव्हा इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा आवॄत्ती आलेली आहे, मी थोड्या सुधारणांची अपेक्षा नक्कीच करतो. विंडोज ७  च्या यशानंतर आणि विंडोज मोबाईल ७ प्रमाणे संपूर्ण नव्याने बनवलेल्या इंटरनेट एक्सप्लोरर ९ कडून अपेक्षा बर्‍याच आहे. पाहूया...घोडामैदान जवळच आहे.

इंटरनेट एक्सप्लोरर ९ बेटा इथून डाऊनलोड करता येईल - http://ie.microsoft.com/testdrive/

जरूर वापरून पहावे असे काही - 

वेबकिट डाऊनलोड करा http://nightly.webkit.org
हे वापरण्यासाठी सफारी इंस्टॉल असणे गरजेचे आहे. http://www.apple.com/safari/download/ 
आणि 
वेबकिट इंस्टॉल करण्यासाठी पहा - http://priscimon.com/blog/2008/06/04/four-easy-steps-to-running-webkit-on-windows/


 तुमचा ब्राऊजर टेस्ट करा - http://acid3.acidtests.org/ मी फायरफॉक्स वापरतो, माझा स्कोर आहे ९४/१००